शिंदे-फडणवीस सरकारने महाविकासआघाडी सरकारमधील अनेक माजी मंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. यात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचाही समावेश आहे. याविषयी बोलताना सुरक्षा काढून घेण्यामध्ये राजकीय वास असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर, जनता हीच आमची सुरक्षा असल्यामुळे सुरक्षा काढून घेतल्याचा वैयक्तिक काही फरक पडत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.